Last Updated: Tuesday, January 24, 2012, 10:29
www.24taas.com, अॅडलेड
मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा. ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला व्हाईट व्हॉश देण्यासाठी आजपासून अँडलेड टेस्टमध्ये सज्ज झाली आहे. पण आज चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फंलदाजी सुरवातीलाच गडबडली. लचं पर्यंत ऑसींनी आपल्या ३ विकेट गमावल्या होत्या. त्यात दोन विकेट आर. अश्विनने घेतली तर एक विकेट झहीर खानने मिळवली.
लंचपर्यंत ऑसी ९८ रन्सच्या मोबदल्यात तीन विकेट गमवल्या तरी आता भारतासमोर ऑसी कॅप्टन मायकल क्लार्क आणि पॉण्टिंग यांना झटपट बाद करण्याचं आव्हान असणार आहे. पॉण्टिंग हा ४३ रन्सवर आहे तर या सीरीजमध्ये फॉर्ममध्ये असलेला मायकल क्लार्क हा पॉण्टिंगच्या साथीला आहे. अँडलेडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये सुरुवातीच्या पडझडीनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव मात्र सावरला आहे. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
पण, पर्थ टेस्टमध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या धडाकेबाज डेव्हिड वॉर्नरचा अडसर झहीर खाननं लगेचच दूर केला. त्यानंतर अश्विननं शॉन मार्शचा काटा काढला. वॉर्नर आणि मार्श झटपट तंबूत तर कोवेननं याला देखील अश्विन लक्ष्मणकरवी झेलबाद करीत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोवेन परतल्यानंतर पाँटिंग आणि मायकल क्लार्क यांनी कांगारूंचा डाव सावरला आहे
ऑस्ट्रेलिया – (पहिला डाव ) 98/3ओव्हर्स - 29. 0
First Published: Tuesday, January 24, 2012, 10:29