सचिन आऊट, विराटचे अर्धशतक - Marathi News 24taas.com

सचिन आऊट, विराटचे अर्धशतक

www.24taas.com, अॅडलेड
 
अॅडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुन्हा नांगी टाकली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा निराशा केली आहे. तो २५ रन्सवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या ६०४ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली आहे. १६९ रन्सवर ५ विकेट गेल्या आहेत.
 
वीरेंद्र सेहवाग १८, गौतम गंभीर ३४, लक्ष्मण १८ आणि सचिन तेंडुलकर २५ रन्सवर आऊट झालेत. विराट कोहली ५४ तर बुध्दीमान साहा १७ रन्सवर खेळत आहेत. टीम इंडिया  अजूनही  पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला या मॅचमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

First Published: Thursday, January 26, 2012, 10:28


comments powered by Disqus