Last Updated: Thursday, January 26, 2012, 14:57
www.24taas.com, अॅडलेड टीम इंडियाच्या विराट कोहलीने झुंजार शतक फटकावून टीमला नवा सूर दाखवून दिला आहे. कसोटी कारर्कीदीतील विराटचे पहिले शतक आहे. ऑस्ट्रेलियात सचिन, लक्ष्मण, द्रविड, सेहवाग यांच्यासारख्या खेळाडूंनी नांगी टाकली असताना विराट खेळी करून टीम इंडियाची इज्जत राखली आहे.
मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा. विराट एक बाजू टिकवून धरून असताना झहीर खान, ईशान शर्मा हे दोघे तंबूत परतले. टीम इंडियाच्या ९ बाद २६७ धावा झाल्या आहेत. झहीर ०, आर. आश्वीन ५, ईशान शर्मा १६ , विराट ११६ रन्सवर आऊट झालेत. उमेश यादव ० वर नाबाद राहिला. टीम इंडियाच्या पहिल्या डावात केवळ २७२ रन्स झाल्यात त्या विराटच्या ११६ रन्स आहेत.
अॅडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुन्हा नांगी टाकली असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली. विराट कोहली आणि बुध्दीमान साहाने शतकी भागिदरी केली. बुध्दीमान साहा ३५ रन्सवर आऊट झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा निराशा केली आहे. तो २५ रन्सवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या ६०४ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली आहे. वीरेंद्र सेहवाग १८, गौतम गंभीर ३४, लक्ष्मण १८ आणि सचिन तेंडुलकर २५ रन्सवर आऊट झालेत. टीम इंडिया अजूनही पिछाडीवर आहे.
टीम इंडिया- पहिला डाव 272 ऑस्ट्रेलिया - डाव घोषित 604/7
First Published: Thursday, January 26, 2012, 14:57