इंडियाची दिवाळी, इंग्लंडची झाली राखरांगोळी - Marathi News 24taas.com

इंडियाची दिवाळी, इंग्लंडची झाली राखरांगोळी

झी 24 तास वेब टीम, कोलकाता
 
टीम इंडियाने सलग पाचवा विजय मिळवून, दिला इंग्लंडला व्हॉईटवॉश. तब्बल 95 रन्सनी दिली इंग्लंडला मात,  त्यामुळे खऱ्या अर्थाने इंडियाने दिवाळी साजरी केली.  आर. अश्वीन ने तीन तर जाडेजाने चार विकेटस घेतल्या. भारताने एक दिवसीय सामन्यांची मालिका ५-० अशी जिंकून इंग्लंडला व्हाईटवॉश दिला. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर भारतीय संघाने दिवाळी साजरी केली आहे.
 

टीम इंडियाने मिशन व्हॉईटवॉश देण्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंडने एकवेळ सारा सामना आपल्या बाजूने झुकविला होता. परंतु जडेजाच्या फिरकी इंग्लिश बॅटसमनची अशरक्ष: भंबेरी उडाली. त्यामुळे पहिल्या भागिदारीच्या मेहनतीवर इंग्लंड बॅटसमननी पाणी फिरवले 174  धावांवर 8 गडी बाद झाले.
 
इंग्लंड अत्यंत सावध पण तितकीच धडाकेबाज सुरवात केली. कुक आणि किस्वेटर यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 129 रन्सची मजल मारली.
 
इंडियाने 50 ओव्हरमध्ये इंग्लंडला 272 धावाचं आव्हान समोर ठेवलं आहे. सुरवातीला केलेली आश्वासक बॅटींग, त्यानंतर इंडियाची उडालेली दाणादाण, आणि त्यानंतर झालेल्या छोट्या छोट्या भागीदाऱ्या आणि धोनीच्या धडाकेबाज धुलाईमुळे इंडियाने हा टप्पा गाठला.
 
इंडियाच्या आश्वासक सुरवातीनंतर मात्र इंडियाची चांगलीच घसरगुंडी झाली आहे. 17 ओव्हरमध्ये 80 रन्सची मजल इंडियाने मारली मात्र त्यानंतर इंडियाचे तीन बॅट्समन झटपट पॅव्हेलियन मध्ये परतले, गंभीरची विकेट फिन याने काढली, त्याने 38 रन्सची खेळी केली त्यात 4 फोरचा समावेश होता, फिनने आणखी एक धक्का इंडियाला दिला त्याने फॉर्मात असणाऱ्या विराट कोहलीला शून्यावर आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला, त्याच पाठोपाठ अजिंक्य राहाणेने चुकीचा फटका मारण्याचा नादात आपली विकेट देऊन बसला, त्याने 41 रन्सची संयमी खेळी केली ज्यात 6 फोरचा समावेश होता.
 
इंडिया वि. इंग्लंड यांच्या दरम्यान 5व्या व फायनल वनडे मॅचला कोलकत्ता मधील इडन-गार्डनमध्ये खेळली जात आहे. इंग्लंडने प्रथम टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तर इंडियाने पहिले बॅटिंग करताना चांगली व आश्वासक सुरवात केली.
 
इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत भारताने ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता इंग्लंडविरूद्धची पाचवा वन डे सामना कोलकातामध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे इंग्लंडला ५-० असा व्हाईटवॉश देण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
 
कोलकाताच्या ईडन गार्डनवर आजचा सामना खेळवल जाणार आहे. भारतीय संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

First Published: Thursday, October 27, 2011, 07:53


comments powered by Disqus