टीम इंडियाला पहिला धक्का - Marathi News 24taas.com

टीम इंडियाला पहिला धक्का

www.24taas.com, अॅडलेड
 
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने  दुसरा डाव १६७ रन्सवर घोषित केला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर ५०० रन्सचे टार्गेट आहे. मात्र, पुन्हा फलंदाजी ढेपाळण्याची शक्यता आहे. गौतम गंभीर आऊट झाला.
 
मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
 
टीम इंडियाची दुसऱ्या डावातही निराशाजनक सुरूवात झाली आहे.  गौतम गंभीर ३ रन्स वर आऊट झाला. वीरेंद्र सेहवाग १९  तर राहुल द्रविड १ रन्सवर खेळत आहे.  २४ रन्सच्या बदल्यात १ विकेट गेली आहे.  टीम इंडियातर्फे ईशान शर्माने हसीची विकेट काढली. तर रिकी पॉंटिंगने अर्धशतक करताना ५७ रन्स केल्या आहेत.  झहीर खानने ३२ धावांमध्ये १ बळी मिळवला तर आर. अश्विनने ५८ धावांच्या बदल्यात २ फलंदाज गारद केले.
 
टीम इंडिया - दुसरा डाव 24/१

ऑस्ट्रेलिया –  दुसरा डाव घोषित 167/5
टीम इंडिया - पहिला डाव  272 
ऑस्ट्रेलिया – डाव घोषित  604/7
 

First Published: Friday, January 27, 2012, 11:30


comments powered by Disqus