Last Updated: Saturday, January 28, 2012, 13:07
www.24taas.com, अॅडलेड ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला लाजीरवाणा व्हाइटवॉश मिळाला. कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा तब्बल २९८ धावांनी पराभव केला. या दमदार विजयाच्या बळावर मालिका ४-० अशा मोठ्या फरकाने जिंकण्यात कांगारूंना यश आले आहे.
मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा. टीम इंडियाचा हा विदेशातील सलग आठवा पराभव आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर ५०० धावांचे लक्ष्य ठेवले होते. ते पार करण्यासाठी टीम इंडियाची फलंदाजांनी दमदार फलंदाजी करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने पराभवाची नामुष्की ओढविली.
टीम इंडियाची तळाची दुबळी फळी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर तासाभरात निखळली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तब्बल२९८ धावांनी टीम इंडियावर विजय मिळविता आला. ऑस्ट्रेलियाचा पीटर सिडल हा सामनावीर ठरला तर चमकदार खेळी करणारा मायकल क्लार्कला मालिकावीराचा मान मिळाला.
धावफलकऑस्ट्रेलियापहिला डाव घोषीत - 604/7दुसरा डाव घोषीत 167/5 टीम इंडियापहिला डाव 272/10दुसरा डाव 201/10
First Published: Saturday, January 28, 2012, 13:07