तिरंगी मालिकेसाठी कांगारुंचा संघ जाहीर - Marathi News 24taas.com

तिरंगी मालिकेसाठी कांगारुंचा संघ जाहीर

www.24taas.com, मेलबर्न
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठीच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर करण्यात आला असून संघातून शॉन मार्शला डच्चू देण्यात आला आहे. शॉन मार्शची गेल्या चार कसोटीत निराशाजनक कामगिरीमुळे त्याला डच्चू दिल्याचे समजते आहे.
 
मार्शला ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत स्पर्धेत म्हणजे शेफिल्ड शील्डमध्ये खेळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ब्रॅड हॅडिनलाही विश्रांती देण्यात आलीय. तर क्वीन्सलँडचा फलंदाज पीटर फॉरेस्टला पहिल्यांदाच संघात स्थान मिळाल आहे.   पाच फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाला भारत आणि श्रीलंकेचा सामना करायचा आहे.
ऑस्ट्रेलिया संघ -
मायकल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पॉण्टिंग, पीटर फॉरेस्ट, झेवियर डोरथी, क्लिंट मॅके, मिचेल मार्श, डॅनिएल ख्रिश्चन, मायकल हसी, डेव्हिड हसी, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क.

First Published: Monday, January 30, 2012, 13:53


comments powered by Disqus