Last Updated: Wednesday, February 1, 2012, 14:37
www.24taas.com, सिडनी 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला सपाटून मार खावा लागला. ०-४ नं सीरिज गमावलेल्या भारतीय टीमसमोर आता कांगारुंच्या यंगिस्तानची कडवी टक्कर टी-२० मॅचेमध्ये मिळणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर पहिली टी-२० मॅच रंगणार आहे. जॉर्ज बेलीच्या कांगारु टीमला रोखण्यासाठी टीम इंडियाला चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत. पण तरीही अजूनही टीम इंडियाचं टी-२० मध्ये हॉट फेवरीट मानली जाते आहे.
पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताला जॉर्ज बेलीच्या यंग टीमला सामोर जाव लागणार आहे. वन-डे मधील वर्ल्ड चॅम्पियन टीमला ही मॅच जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. भारताच्या टीमची भिस्त ही सुरेश रैना, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तीन युवा बॅट्समनवर असणार आहे. टीम इंडियाच्या टी-२० आणि वन-डे मॅचमध्येमध्ये हे तिघजण नेहमीच निर्णायक भूमिका बजावत आले आहेत. मात्र, कांगारुंच्या तेज तर्रार पीचवर या युवा बॅट्समनचा चांगलाच कस लागणार आहे. विराट कोहलीनं टेस्ट सीरिजमध्ये भारताकडून एकमेव टेस्ट सेंच्युरी झळकावली होती. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगीरीची अपेक्षा टीमला पुन्हा एकदा असणार आहे.
रोहित आणि रैनाला रन्स काढण्यासाठी झगडावं लागणार आहे. मुंबईकर रोहितनं मायदेशात झालेल्य़ा विंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. तर बॉलिंगमध्ये प्रविण कुमार टीम इंडियात कमबॅक करतो आहे. २००८ मध्ये झालेल्य़ा सीबी सीरिजमध्ये त्यानं आपली वेगळी छाप सोडली होती. तर इरफानलाही प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्य़ाची शक्यता आहे. ओपनिंगला वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्याकडूनही टीमला अपेक्षा असतील. टेस्ट सीरिजमध्ये सुपर प्लॉप ठरलेली ही ओपनिंग जोडी टी-२० मध्य़े याची कसर भरुन काढण्यास आतूर असतील.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. टेस्ट सीरिजमध्ये भारताला सळो की पळो करुन सोडणार वॉर्नर टी-२० स्पेशलिस्ट म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे त्याला रोखण्याच आव्हान भारतासमोर असेल. ब्रेट ली ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये परतला आहे. त्याचप्रमाणे युवा कॅप्टन जॉर्ज बेली हा आक्रमक कॅप्टन आहे. त्यानं न्यूझींलडविरुद्ध ऑस्ट्रेलिया ए चं यशस्वी नेतृत्व केलं होतं. आता टीम इंडिया काय कमाल करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
First Published: Wednesday, February 1, 2012, 14:37