Last Updated: Saturday, October 29, 2011, 07:08
झी २४ तास वेब टीम, चेन्नई वेस्ट इंडिज विरोधातील टेस्ट टीम जाहीर 
वेस्ट इंडिज विरोधातील टेस्ट सिरिजच्या पहिल्या मॅचसाठी टीम इंडिया जाहीर झाली असून या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचे पुनरागमन झाले आहे. तर टर्बनेटर हरभजन सिंग याला पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे.
चेन्नईत आज टीम इंडियाच्या सिलेक्शन कमिटीच्या झालेल्या बैठकीत आज संघ जाहीर करण्यात आला. टेस्ट टीम पुढील प्रमाणे - कॅप्टन महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, आर. आश्विन, वरुण ऐरॉन, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, राहुल द्रविड, उमेश यादव, राहुल शर्मा, युवराज सिंग,गौतम गंभीर, प्रज्ञान ओझा, अजिंक्य राहणे, ईशांत शर्मा.
First Published: Saturday, October 29, 2011, 07:08