पाकिस्तानी खेळाडू आमिरची जेलमधून सुटका - Marathi News 24taas.com

पाकिस्तानी खेळाडू आमिरची जेलमधून सुटका

www.24taas.com, पोर्टलँड
 
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी शिक्षा झालेला पाकिस्तानचा मोहम्मद आमिरची इंग्लंडच्या जेलमधून सुटका झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त आमिर इंग्लंडच्या पोर्टलैंड जेलमध्ये शिक्षा भोगत होता. कोर्टाने त्याला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती.
 
१९ वर्षाच्या आमिरची बुधवारी या जेलमधून सुटका झाली. त्याच्या बरोबरच पाकिस्तानचा पूर्व कॅप्टन सलमान बट याला दोन वर्ष तर फास्ट बॉलर मोहम्मद आसिफला एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आयसीसीनं या तिन्ही क्रिकेटर्सवर यापूर्वीच प्रतिबंध घातला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन सलमान बट आणि फास्ट बॉलर मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर ह्यांना लंडनच्या साऊथवार्कच्या क्राऊन कोर्टाने स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली होती.
 
कोर्टाने बट्टला धोकेबाजी आणि फिक्सिंग यांच्याविरोधी रचलेल्या षडयंत्रात दोषी ठरवलं होतं तर आसाफिला देखील दोषी ठरवल ं  होतं, तर या तीनही खेळाडूंना आता आईसीसीने बंदी घातली आहे. पण आता मोहम्मद आमिर सहा महिन्याची शिक्षा भोगून बाहेर आला आहे.

First Published: Thursday, February 2, 2012, 11:41


comments powered by Disqus