इयान चॅपल पुन्हा बरळला - Marathi News 24taas.com

इयान चॅपल पुन्हा बरळला

www.24taas.com, मेलबर्न
 
 
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार इयान चॅपल पुन्हा बरळला आहे.  कसोटी सामन्यात टीम इंडियाला लागलेल्या पराभावानंतर  भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीतील सदस्यांना मुर्ख असे संबोधले आहे.
 
 
भारतीय खेळाडूंची मानसिकता खालावली असल्याचे ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली याने शुक्रवारी म्हटले होते. आता चॅपल यांनी निवड समितीच्या सदस्यांना टार्गेट केले आहे. ऑस्ट्रेलियन नेहमीच दुसऱ्यांना कमी लेखत असतात.
 
 
सध्या सर्व संघ युवा खेळाडूंना संघात स्थान देत असताना, भारतीय संघ मात्र युवा खेळाडूंना संधी देत नाही. युवा खेळाडू संघात आल्यानंतर एक नवा उत्साह तयार होते. तर वरिष्ठ खेळाडूंच्याही जोशात भर पडते. त्याच्या परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो. मात्र, भारतीय निवड समितीचे सदस्य या गोष्टीकडे लक्ष देण्यास तयारच नाहीत. ते मुर्ख आहेत, असे चॅपल म्हणाला.

First Published: Saturday, February 4, 2012, 10:53


comments powered by Disqus