Last Updated: Tuesday, February 7, 2012, 13:12
www.24taas.com, नवी दिल्ली 
युवराज सिंगचे फिजिओ जतिन चौधरी यांच्याकडे मान्यप्राप्त डिग्री नसल्याचा गौप्यस्फोट दिल्ली मेडिकल कौन्सिलनं केला आहे.
जतिन चौधरींनीच युवराजला कॅन्सर झाल्याच सांगितलं होतं. मात्र, आता त्याच्या फिजिओकडे मान्यप्राप्त डिग्री नसल्यानं एक नवा वाद उफाळून आला आहे. डिग्री नसल्यानं युवीच्या फिजिओवर कारवाई करण्याची मागणी दिल्ली मेडिकल कौन्सिलनं केली आहे. दरम्यान, युवराज अमेरिकेमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे.
युवराज सिंगवर अमेरिकेत किमोथेरपी करण्यात आली आहे. युवराज सिंग 18 जानेवारीलाच उपचार घेण्यासाठी अमेरिकेला रवाना झाला होता. त्याचप्रमाणे युवराजचे फिजिओ जतिन चौधरी यांनी युवीला कॅन्सर झाल्याच सांगितलं आहे. पहिल्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे चिंतेची बाब नसल्याचही फिजोओनीं सांगितलंय.
युवीच्या डाव्या फुफ्फुसामध्ये ट्युमर झाला होता. 'द टेलीग्राफ' या वृत्तपत्रानं हे वृत्त दिलं आहे.एप्रिल महिन्यापर्यंत तो पूर्णपणे फिट होणार असल्याच बोलल जातंय. युवराज मे महिन्यातमैदानावर परतण्याची शक्यता आहे.
First Published: Tuesday, February 7, 2012, 13:12