Last Updated: Tuesday, November 1, 2011, 06:29
झी २४तास वेब टीम, नवी दिल्ली टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आता लेफ्टनंन्ट कर्नल झाला आहे. आर्मीनं धोनीचा गौरव केला आहे. आता त्याला ही मानद आज प्रदान करण्यात येणार आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन झाली. त्याचप्रमाणे टेस्टमध्येही अव्वल स्थानी विराजमानही झाली होती. तसचं २००७ मध्ये झालेल्या पहिल्या-वहिल्या टी-२० वर्ल्ड कपचं अजिंक्यपदही धोनीच्या नेतृतत्वाखालीच टीम इंडियानं पटकावलं होतं.
धोनीबरोबरच भारताचा अव्वल नेमबाज अभनिव बिंद्रालाही ऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल पटकाविल्यामुळे लेफ्टनन कर्नल किताब दिला आहे. धोनी आणि बिंद्राच्या आधी टीम इंडियाचा माजी कॅप्टन कपिल देवला २००८ मध्ये टेरीट्रोरियल आर्मीचं लेफ्टनंन्ट कर्नल पद दिलं होतं. तर सचिन तेंडुलकर. २०१० मध्ये इंडियन एअर फोर्सचा ग्रुप कॅप्टन झाला होता.
First Published: Tuesday, November 1, 2011, 06:29