फॉरेस्ट-हसीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला - Marathi News 24taas.com

फॉरेस्ट-हसीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला

www.24taas.com, ऍडलिड
 
ट्राय सीरिजमध्ये ऍडलिड वनडेत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने २७ ओव्हर्सच्या अखेरीस तीन बाद १३२ रन्स फटकावल्या.
 
डेव्हिड वॉर्नर आणि रिकी पॉटिंगने या नव्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या इनिंगला सुरवात केली. विनयकुमारने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १४ वर असताना रिकी पॉटिंगला विराट कोहलीकरवी कॅटआऊट केल. तर धोकादायक डेव्हिड वॉर्नरही १८ रन्सवर आऊट झाला.
 
त्यानंतर टीममध्ये संधी मिळालेल्या उमेश यादवने मायकेल क्लार्कला ३८ रन्सवर आऊट केलं. पदार्पण करणाऱ्या पीटर फॉरेस्ट आणि फूल फॉर्ममध्ये असलेल्या डेव्हिड हसी यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. आजच्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला विश्रांती दिली आहे.

First Published: Sunday, February 12, 2012, 10:56


comments powered by Disqus