Last Updated: Wednesday, February 15, 2012, 13:40
www.24taas.com, नवी दिल्ली देशभरात बॉलर्सची चांगली फळी तयार करण्यासाठी बीसीसीआयने नवा कार्यक्रम सुरू केला आहे. याद्वारे आता वेगवेगळ्या केंद्रावर फास्ट बॉलर्स आणि स्पिनर्स यांची ओपन ट्रायल होणार आहे.
बीसीसीएयच्या निवेदनामुसार राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येत्या दोन आठवड्यात हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, झारखंड आणि छत्तीसगढ़ या ठिकाणी अशा प्रकारच्या ट्रायल्स घेण्यात येतील. यात वय वर्षं १७ ते २२ वयोगटातील मुलं सहभागी होऊ शकतात. मात्र, या खेळाडुंनी याआधी बीसीसीआय मान्यताप्राप्त एखादा सामना खेळलेला असला पाहिजे.
माजी क्रिकेटर करसन घावरी आणि योगेंदर पुरी या ट्रायलच्यावेळी उपस्थित असतील आणि योग्य बॉलर्सची निवड करतील. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे १८-१९ फेब्रुवारीला ही ट्रायल होईल. यानंतर जम्मूमध्ये २२,२३ फेब्रुवारी, रांचीमध्ये २५ फेब्रुवारी आणि रायपुरमधये २८ फेब्रुवारी रोजी हे ट्रायल शिबिर घेण्यात येणार आहे.
First Published: Wednesday, February 15, 2012, 13:40