जाहिरात विश्वात सचिनवर धोनीची बाजी - Marathi News 24taas.com

जाहिरात विश्वात सचिनवर धोनीची बाजी

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
 
क्रिकेटच्या मैदानावर महेंद्रसिंग धोनी तर सुपरहिट ठरलाच आहे.  जाहिरांताच्या विश्वातही तोच सध्या जाहिरातदारांची पहिली पसंती बनल्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकत तो ब्रॅन्ड नंबर वन बनला आहे.
 
शिवाय मैदानाबाहेरही कॅप्टनकूल धोनीचाच बोलबाला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं भारताला अनेक अविस्मरणी विजय मिळवून दिले आहेत. एक बॅट्समन, विकेटकिपर त्याचप्रमाणे एक कॅप्टन म्हणूनही तो यशस्वी ठरला आहे.
 
धोनीच्या या शानदार कामगिरीमुळेच जाहिरात विश्वाचाही तो फेव्हरीट बनला आहे. त्याच्या हेअर स्टाईल आणि लुकमुळे आपल्या ब्रॅडसाठी धोनीला जाहीरातदार सर्वात जास्त पसंती देत असतात. आपल्या स्फोटक बॅटिंगमुळे धोनीनं जाहिरातदारांना आपल्याकडे लक्ष द्यायला भाग पाडलं. आणि त्यानंतर आता तो जाहिरात विश्वाचा राजा झाला आहे. प्रत्येक जाहीरातदार हा धोनीनच आपल्या प्रोडक्टची जाहीरात करावी यासाठी आग्रही असतात. ज्या आत्मविश्वासानं धोनीनं क्रिकेटच्या मैदानावर वावरतो. तोच आत्मविश्वास जाहिरातीतही दिसून येतो.
 
एक स्टाईल आयक़ॉन म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. जाहिरातींच्या विश्वात तर त्यानं आता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं आहे. धोनीआधी जाहिरात विश्वावर सचिनचच अधिराज्य होतं. मात्र सचिन हे साम्राज्य माहीनं खालसा केलं. टीम इंडियाचा हा अस्सल योद्धा सध्या क्रिकेटविश्वावर तर आपलं अधिराज्य तर गाजवतो आहे. शिवाय जाहिरात विश्वाचाही अनभिषिक्त सम्राट आहे ह, ब्रॅन्ड नंबर वन वरून दिसून येत आहे.

First Published: Thursday, November 3, 2011, 05:18


comments powered by Disqus