Last Updated: Saturday, February 18, 2012, 14:24
www.24taas.com, ब्रिस्बेन टीम इंडियाचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे. दुखापतीमुळे सेहवागने या सामन्यातून माघार घेतली आहे.
सेहवागची पाठ दुखत आहे. त्यामुळे त्याला आराम देण्यात येत आहे. श्रीलंकेने शुक्रवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत पोहचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागणार आहे. सेहवाग नसल्याने टीम इंडियाला याची कमतरता जाणवणार आहे.
टीम इंडिया संघात सलामीच्या स्थानासाठी रोटेशन पद्धती अवलंबिली जात असून, या सामन्यात गौतम गंभीरला विश्रांती देण्यात येणार होती. मात्र, आता सेहवागने माघार घेतल्याने टीम इंडियाच्या डावाची सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर करतील.
First Published: Saturday, February 18, 2012, 14:24