Last Updated: Monday, February 20, 2012, 10:37
www.24taas.com, ब्रिस्बेन 
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याच्यावर पुढील वन-डेसाठी बॅन लावण्यात आला आहे. ब्रिस्बेन इथं ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन-डेमध्ये ओव्हर्सची गती कमी ठेवल्यामुळे धोनीवर हा बॅन लावण्यात आला आहे.
यामुळे ब्रिस्बेन इथं मंगळवारी श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या वन-डेमध्ये त्याला खेळता येणार नाही. याचबरोबर धोनीवर मॅच फीच्या ४० टक्के रक्कम कापण्यात येणार असून टीम इंडियाच्या प्लेअर्सच्या मॅच फीमधून २० टक्के रक्कम कापण्यात येणार आहे.
दरम्यान यापूर्वी टेस्ट सीरिजमध्येही स्लो ओव्हर रेटमुळे धोनीवर अखेरच्या ऍडलेड टेस्टमध्ये बॅन लादण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या पराभवानंतर धोनीवर लादण्यात आलेल्या या बॅनमुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का बसला आहे.
First Published: Monday, February 20, 2012, 10:37