Last Updated: Tuesday, February 21, 2012, 15:30
www.24taas.com, सिडनी 
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगने वन-डे क्रिकेटमधून रिटारयमेंट घोषित केली आहे. तसंच तो आता टेस्ट क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचंही पॉन्टिंगने सिडनी येथे घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान सांगितलं आहे.
३७ वर्षीय पॉन्टिंगने ३७५ वन-डे ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधीत्व करताना १३ हजार ७०४ रन केले आहेत. त्याने वन-डे करिअरमध्ये तब्बल ३० सेंच्युरीही ठोकल्या आहेत. पॉन्टिंगला सध्या सुरू असलेल्या ट्राय सीरिजमध्ये दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. पॉन्टिंगच्याच कुशल नेतृत्वाखाली कांगारूंनी दोनदा वर्ल्ड कपही पटकावला होता.
कालच भारताचा माजी कॅप्टन कपिल देवने सचिनने निवृत्त व्हावं असं वक्तव्य केलं होतं. पॉन्टिंगच्या या निर्णयाने आता या चर्चेला पुन्हा एकदा उधाण येणार हे मात्र नक्की.
First Published: Tuesday, February 21, 2012, 15:30