काय आहे टीम इंडियाचं रँकिंग? - Marathi News 24taas.com

काय आहे टीम इंडियाचं रँकिंग?

www.24taas.com, दुबई
 
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे ११६ पॉईंट्स आहेत. दुसऱ्या स्थानावर कायम राहण्यासाठी भारताला ट्राय सीरिज जिंकावीच लागणार आहे. बॅटिंगमध्ये कॅप्टन धोनीच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. तर सेहवाग १८ व्या स्थानावर फेकला  गेला आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
 
टेस्ट सीरिजप्रमाणेच ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियाची पराभवाची मालिका सुरुच आहे. ट्राय सीरिजमध्ये भारतीय टीमची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. या पराभवाचा फटका भारताला आयसीसी रँकिंगमध्येही बसण्याची शक्यता आहे. भारताला वन-डेत नंबर वन होण्याची संधी नाही. मात्र, आपलं दुसरं स्थान टिकवून ठेवण्याच आव्हान आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रेस फॉर नबंर टू रंगते आहे. धोनी ब्रिगेडला रँकिंगमध्ये आपलं दुसर स्थान कायम राखण्यासाठी ट्राय सीरिजमध्ये चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. यासाठी भारताला पुन्हा एकदा विनिंग ट्रॅकवर परताव लागणार आहे.
 


























































क्र.टीम पॉईंट्स
ऑस्ट्रेलिया  १२९
भारत  ११६
द. आफ्रिका ११६
श्रीलंका ११३
इंग्लंड   १११

 
आयसीसी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम नंबर वनवर कायम आहे.  तर ११६ पॉईंट्सह भारत दुसऱ्या  आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहेत. श्रीलंका आणि इंग्लंड अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. भारताला वन-डे रँकिंगमधील आपलं दुसरं स्थान वाचविण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे वीरेंद्र सेहवागला खराब कामगिरीचा फटका बसला आहे.
 
सेहवाग १८ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची ट्राय सीरजमध्ये झालेली समाधानकारक कामगिरी त्याला आपलं  रँकिंग सुधारण्यासाठी फायदेशीर ठरली आहे. त्यानं रँकिगमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तर विराट कोहलीनं आपला तिसरा क्रमांक कायम राखला आहे. मात्र, टॉप टेन बॉलर्समध्ये एकाही भारतीय बॉलरला स्थान मिळवता आलेलं नाही.
 
 

First Published: Thursday, February 23, 2012, 15:59


comments powered by Disqus