सचिन तेंडुलकरला पर्याय नाही- वेंगसरकर - Marathi News 24taas.com

सचिन तेंडुलकरला पर्याय नाही- वेंगसरकर

www.24taas.com, मुंबई
 
सचिन तेंडुलकर याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी या कपिल देव यांच्या विधानाचा भारताचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी चांगलाच समाचार घेतला. वेंगसरकर म्हणाले की सचिनसारख्या चँपियन खेळाडूला या बाबतीत कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही.
 
वेंगसरकर म्हणाले, “एका महान खेळाडूने कधी संन्यास घ्यावा याचा इतर कुणीही सल्ला देण्याची गरज नाही. जेव्हा सचिनला जाणवेल, तेव्हा तो निवृत्ती जाहीर करेल.” वर्डकप जिंकल्यावर लगेच सचिनने निवृत्त व्हायला हलं होतं, असं विधान काही दिवसांपूर्वी कपिल देव यांनी केलं होतं.
 
कपिल देव म्हणाले होते, “मला वाटतं वर्ल्ड कप जिंकल्यावर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून संन्यास घ्यायला हवा होता.” वेंगसरकर म्हणाले की, ३९व्या वर्षीही सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेट टीममधील इतर खेळाडूंएवढाच फिट आहे. सचिनची एकाग्रता, समर्थन आणि खेळाप्रती असणारं समर्पण हे कौतुकास्पद आहे.

First Published: Thursday, February 23, 2012, 18:50


comments powered by Disqus