Last Updated: Friday, February 24, 2012, 14:05
www.24taas.com, होबार्ट ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेदरम्यान होबार्ट येथे सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २८१ रन्सचे टार्गेट ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली नाही. सलामीवीर मॅथ्यू वेड अवघ्या पाच तर वॉर्नर सात रन्स करून बाद झाला. फॉरेस्टने मात्र दमदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने १३८ चेडूंमध्ये १०४ रन्स केल्या, कर्णधार मायकेल क्लार्कने अर्धशतक झळकावताना ७२ रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २८० रन्स केल्या. श्रीलंकेकडून मॅथ्यूने दोन तर मलिंगा, महारुफ, केक्कारा, हेर्थने प्रत्येकी एक गडी बाद केला.
श्रीलंका - 85/1 (12.6 ov)ऑस्ट्रेलिया - 280/6 (50 ov)
First Published: Friday, February 24, 2012, 14:05