Last Updated: Monday, February 27, 2012, 16:44
www.24taas.com, मुंबई
परदेशी जमिनीवर टीम इंडियाची खराब कामगिरी आणि संघातील कुरबुरींच्या बातम्यांमुळे बीसीसीआय कडक पाऊले उचलण्याचे ठरविले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना भारतीय संघातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सेहवागने कर्णधार धोनीबरोबर घातलेला वाद चुकीचा होता. सेहवागने ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या तिरंगी मालिकेत मागील चार सामन्यात फक्त ३५ धावा केल्या आहेत सेहवागला पुन्हा फॉर्ममध्ये परतण्यासाठी बांगलादेशमध्ये होणाऱ्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतून वगळण्यात येणार आहे, असल्याची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांकडून मिळते आहे.
दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही या स्पर्धेसाठी विश्रांती देण्याची शक्यता आहे. महशतकाच्या दबावातून मुक्ती मिळण्यासाठी सचिनला विश्रांती देण्यात येईल. त्यामुळे या दोघांना आगामी आशिया कप मधून डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.
First Published: Monday, February 27, 2012, 16:44