Last Updated: Wednesday, February 29, 2012, 15:11
www.24taas.com, मुंबई
आशिया कपसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळणार असून ऑस्ट्रेलियात खराब फॉर्मने झगडत असलेल्या वीरेंद्र सेहवाग याला डच्चू देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
येत्या १२ मार्चपासून भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात आशिया कप स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघांची निवड करण्यासाठी आज मुंबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. नुकतीच ही बैठक संपली असून निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला १६ च्या संघात स्थान देण्यात आले, असून सेहवागला डच्चू देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
अशिया कपमधील टीम पुढीलप्रमाणे-
महेंद्रसिंग धोनी- कर्णधार
विराट कोहली- उपकर्णधार
सुरेश रैना
युसुफ पठाण
रविंद्र जडेजा
आर. अश्विन
अशोक दिंडा
विनय कुमार
प्रवीण कुमार
सचिन तेंडुलकर
गौतम गंभीर
राहुल शर्मा
इरफान पठाण
मनोज तिवारी
डच्चू-
उमेश यादव
विरेंद्र सेहवाग
झहीर खान
First Published: Wednesday, February 29, 2012, 15:11