विक्रमादित्य सचिनच्या १५ हजार धावा - Marathi News 24taas.com

विक्रमादित्य सचिनच्या १५ हजार धावा

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात २८ धावा करत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. सचिन आज १५ हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
 
वेस्ट इंडिजच्या फिरकी गोलंदाज देवेद्र बिशू याच्या गोलंदाजीवर एक धावा घेत सचिनने या ऐतिहासिक क्षणाचा आनंद तमाम क्रिकेट रसिकांना दिला.
 
सचिनने १८२ टेस्टमध्ये ५१ सेंच्युरीजच्या मदतीने १५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
 
आतापर्यंत १२ हजार, १३ हजार आणि १४ हजार कसोटी धावा करणारा सचिन हा पहिला खेळाडू ठरला होता. त्यात आजच्या विक्रमाची भर पडली आहे.
 
सचिनच्या नावावर वन डे तसेच टेस्टमध्ये सर्वाधिक धावांचा आणि सर्वाधिक सेंच्युरीजचा विक्रम यापूर्वीच नोंदविला गेला आहे.
 
सचिनने तेंडुलकरने यापूर्वी सर्वाधिक टेस्ट सेंच्युरी करणाऱ्या लिटील मास्टर सुनिल गावस्कर यांच्या ३४ सेंच्युरीजचा विक्रम मोडला होता.
 
सध्या सचिनच्या नावावर ९९ आंतरराष्ट्रीय सेंच्युरी असून त्याच्या शंभराव्या सेंच्युरीकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे.  

 

First Published: Tuesday, November 8, 2011, 11:51


comments powered by Disqus