टीम इंडिया खालीहात माघारी - Marathi News 24taas.com

टीम इंडिया खालीहात माघारी


www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात  सपाटून मार खाल्लेल्या भारतीय संघाचे आज मायदेशात आगमन होत आहे.  या दौऱ्यात भारतीय संघाला एकही मालिका जिंकण्यात यश आले नाही.  वनडे मालिकेत अंतिम फेरीआधीच झालेलं ‘ पॅक अप ’ , अशा निराशाजनक कामगिरीनंतर अत्यंत खिन्न मनाने, माना खाली घालून टीम इंडियाच्या वीरांनी आज ऑस्ट्रेलियातून प्रस्थान केलं आहे.
 
 
टीम इंडियाचा परतीचा कार्यक्रम आयत्या वेळी ठरल्यानं सगळ्यांना एकाच विमानांची तिकिटे मिळू शकली नाहीत. ‘ मेलबर्न टू सिंगापूर ’ आणि ‘ ब्रिस्बेन टू सिंगापूर ’ अशा दोन विमानांनी १३ खेळाडूंना घेऊन ‘ टेक ऑफ ’ केले.  पहिल्या विमानातून सचिन तेंडुलकर, झहीर खान, रोहित शर्मा, उमेश यादव, विनय कुमार, आर. अश्विन आणि सपोर्ट स्टाफ आधी निघाला. त्यांच्यापैकी काहीजण सिंगापूरहून चेन्नईला जातील, तर मुंबईकर मंडळी मुंबईचं विमान पकडतील.
 
 
कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सुरेश रैना, प्रवीण कुमार आणि राहुल शर्मा हे ब्रिस्बेनहून सिंगापूरमार्गे दिल्लीत दाखल होतील. कसोटी मालिकेत ०-४ असा ‘ व्हाइटवॉश ’ , टी-२०मध्ये १-१ अशी बरोबरी आणि तिरंगी वनडे मालिकेत अंतिम फेरीआधीच झालेलं ‘ पॅक अप ’ , अशा निराशाजनक कामगिरीनंतर अत्यंत खिन्न मनाने, माना खाली घालून टीम इंडियाच्या वीरांनी आज ऑस्ट्रेलियातून प्रस्थान केले आहे. तर इरफान आणि पार्थिव यांना गुजरातला जायचं असल्यानं ते उद्या ऑस्ट्रेलियाला टाटा करणार आहेत.

First Published: Saturday, March 3, 2012, 17:28


comments powered by Disqus