ऑस्ट्रेलियाची १५१ रन्सची दमदार सुरुवात - Marathi News 24taas.com

ऑस्ट्रेलियाची १५१ रन्सची दमदार सुरुवात

www.24taas.com, ब्रिसबेन
 
सीबी सिरीजच्या ब्रिसबेन इथल्या पहिल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्कने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा बँटिंग करण्याचा निर्णय घेतला. सिरीजमध्ये दमदार पदार्पण करणाऱ्या पीटर फॉरेस्टला मायकल क्लार्कसाठी संघात जागा रिकमी करुन द्यावी लागली.
 
ऑस्ट्रेलियाने २६ ओव्हर्सच्या अखेरीस एक विकेटच्या मोबदल्यात १५१ धावांची दमदार मजल मारली. डेव्हिड वॉर्नर ७६ रन्स तर शेन वॅटलन ६ रन्सवर खेळत आहेत. मायकेल वेडने ७२ चेंडूत ६४ रन्स काढताना ४ चौकार आणि १ षटकार ठोकला. कुलशेखराच्या बॉलिंगवर हेराथने वेडला कॅचआऊट केलं.

First Published: Sunday, March 4, 2012, 11:07


comments powered by Disqus