'बेस्ट ऑफ थ्री'मध्ये ऑसींचा पहिला विजय - Marathi News 24taas.com

'बेस्ट ऑफ थ्री'मध्ये ऑसींचा पहिला विजय

www.24taas.com, ब्रिस्बेन
 
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सीबी सिरीजच्या  बेस्ट ऑफ थ्री फायनलमध्ये पहिल्या वन-डेत कांगारूंनी अटीतटीच्या सामन्यात लंकेवर विजय मिळवला आहे. फक्त १५ रनने ऑस्ट्रेलिया विजयी झाला. आठव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या कुलशेखरानं ५४ बॉलमध्ये  ७३ रन करून मॅचमध्ये रंगत निर्माण केली होती.
 
लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
 
पण त्याला लंकेला विजय मिळवून देता आला नाही . ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड हस्सीने ४ विकेट घेतल्या. तर वॉटसन आणि ब्रेट ली यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. त्यामुळे श्रीलंका पराभूत झाल्याने आता पुढील दोनही मॅच जिंकण्यास त्यांना प्रयत्न ांची पराकाष्ठा करावी लागते आहे.
 
डेव्हिड वॉर्नरच्या पहिल्या वहिल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सहा बाद ३२१ रन्सची मोठी धावसंख्या उभारली होती. डेव्हिड वॉर्नरने १६३ रन्स फटकावल्या. वॉर्नर आणि मॅथ्यू वेड यांच्या १३६ धावांची भागीदारीने ऑस्ट्रेलियाने डावाची सुरुवातच दमदार केली. वॉर्नरने ट्वेंटी-२० मध्ये चांगली कामगिरी केली होती तसंच कसोटीत दोन शतकंही ठोकली पण त्याला एक दिवसीय सामन्यात चांगली खेळी करता आली नव्हती.
 
आजच्या दमदार शतकाने वॉर्नरने एक दिवसीय सामन्यातही आपण चांगली इनिंग खेळू शकतो हे दाखवून दिलं आहे. मायकल क्लार्कने ३७ तर शेन वॉटसनने २१ रन्स काढल्या. श्रीलंकेच्या प्रसादने सात ओव्हर्समध्ये ५१ रन्सच्या मोबदल्यात दोन विकेटस घेतल्या तर दिलशान नऊ ओव्हर्समध्ये फक्त ३५ रन्स देत टिच्चून बॉलिंग टाकली.
 
ऑस्ट्रेलिया : 321/6 (ओव्हर 50.0)
श्रीलंका : 306/10 (ओव्हर 49.2)
 
 
 


 

First Published: Sunday, March 4, 2012, 17:29


comments powered by Disqus