कपिल देव यांची धोनीवर टीका - Marathi News 24taas.com

कपिल देव यांची धोनीवर टीका

www.24taas.com, नवी दिल्ली
माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी महिंदरसिंग धोनीवर टीका केली आहे. धोनीचे काही निर्णय पूर्वग्रहदुषित असल्याने त्याच्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली आहे. मागच्या वर्षी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीच्या काही निर्णयांबद्दल कपिल देव यांनी शंका व्यक्त केली.
 
इंग्लंड दौऱ्यासाठी आरपी.सिंग याची निवड का करण्यात आली होती? तसंच मनोज तिवारीला ऑस्ट्रेलियात का खेळवण्यात आलं नाही? सुरेश रैनाला इतके वेळा संधी का देण्यात आली? धोनीच्या वादग्रस्त निर्णयांमुळे त्याच्या हेतुविषयी शंका घेण्यास वाव असल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे.
 
वर्ल्ड कप झाल्यानंतर सचिन तेंडूलकरने तात्काळ निवृत्ती पत्कारायला हवी होती असं कपिल देव म्हणाले आहेत. वन डेतून तेंडूलकरने निवृत्ती घ्यायला हवी होती, त्याला सिद्द करण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.

First Published: Monday, March 5, 2012, 13:45


comments powered by Disqus