आयपीएलपूर्वी भारत VS आफ्रिका टी-२०! - Marathi News 24taas.com

आयपीएलपूर्वी भारत VS आफ्रिका टी-२०!

www.24taas.com,मुंबई
 
ऑस्ट्रेलियातील दारूण पराभवानंतर भारतात परतलेल्या टीम इंडियाला आशिया कप झाल्यावर एक टी-२० सामना खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हावे लागणार आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजे ३० मार्च रोजी वाँडर्समध्ये हा सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात विजयी होणाऱ्याला मंडेला चषक देण्यात येणार आहे.
 
बीसीसीआयचे प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी या सामन्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ११ जणांची टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दक्षिण आफ्रिका आणि बीसीसीआय यांच्यात झालेल्या करारामुळे हा सामना खेळविण्यात येणार आहे.
 
दक्षिण आफ्रिका आणि भारतातील हा सामना आशिया कपनंतर एका आठवड्यात आणि दक्षिण आफ्रिकेच्या न्यूझीलंड दौऱ्याच्या तीन दिवसनंतर घेण्यात येणार आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया भारतात येणार असून खेळाडू आपल्या आयपीएल टीमच्या दावणीला जुंपणार आहे.

First Published: Monday, March 5, 2012, 16:37


comments powered by Disqus