Last Updated: Monday, March 5, 2012, 17:18
www.24taas.com, त्रिनिदाद 
वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर आणि बॅट्समन रूनको मोर्टोन याचा आज दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ३३ होते. त्रिनीदाद आणि टोबागोच्या मध्ये रूनको गाडी चालवत असताना त्याला हा अपघात झाला आहे. गाडीवरील ताबा सुटल्याने तो समोरील पोलला जाऊन धडकला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन क्रिस गेल यांने ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. 'आम्ही आमचा खरा योद्धा गमावला आहे, ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो'. त्याच्या स्मृती आमच्या मनात नेहमीच जाग्या असतील. मी त्याच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहे.
तसचं रूनको आयपीएलच्या ज्या राजस्थान रॉयल्सचा टीम मधून खेळायचा त्यांनी देखील ट्विरवर म्हटलं आहे की, ही फारच दु:खद घटना आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटर यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो. वेस्ट इंडिजकडून ओपनर म्हणून त्याने १५ टेस्ट आणि ५९ वन-डे खेळल्या आहेत. तर त्यात अनुक्रमे ५७३ आणि १५१९ रन केले आहेत.
First Published: Monday, March 5, 2012, 17:18