लंकेने ऑसींना अॅडलेडवर लोळवलं. - Marathi News 24taas.com

लंकेने ऑसींना अॅडलेडवर लोळवलं.

www.24taas.com, अॅडलेड 
 
अॅडलेड येथे झालेल्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या 'बेस्ट ऑफ थ्री'मधील दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेने ८ विकेट बाकी ठेऊन ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे श्रीलंकेने या सिरीजमध्ये चुरस निर्माण केली आहे. तसचं आता तिसरी वनडे देखील खेळावी लागणार आहे. श्रीलंकेने फक्त दोन विकेट गमावून हा विजय मिळवला.
 
लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
 
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २७१ रनपर्यंत मजल मारली होती. वॉर्नर आणि क्लार्क यांनी शतकं झळकावली मात्र ऑसी बॉलर त्यांना विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. श्रीलंकेच्या ओपनिंग जोडीने चांगली सुरवात करून दिली. मात्र त्याचसोबत विजयी पाया देखील रचला.
 
दिलशान यांने १०८ रन तर जयवर्धनेने ८० रन केल्याने एका भक्कम पार्टनरशीपच्या जोरावर हा विजय त्यांना मिळाला आहे. ४४ ओव्हरमध्येच हा विजय त्यांनी संपादन केला. ऑस्ट्रेलियाकडून पॅटीन्सन आणि ब्रेट ली ह्यांना फक्त प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या.
 
पहिला सामना जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २७२ रन्सचे टार्गेट ठेवले होते. डेव्हिड वॉर्नर सलग दुसरे शतक झळकाविले. तर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने तीन बळी मिळविले होते.
 
तिरंगी क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात आज  दुसऱ्या अंतिम फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात बेन हिल्फेनहॉसच्या जागी क्लिंट मॅकेला संघात स्थान देण्यात आले होते. तर श्रीलंकेने चामरा कपुगेदराचा संघात समावेश केला आहे.
 
 
सलामीवीर मॅथ्यू वेडला १४ धावांवर बाद करीत दिलशानने श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शेन वॉटसनही १५ रन्सवर धावबाद झाला. यानंतर आलेल्या कर्णधार मायकल क्लार्कने वॉर्नरच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १८४ रन्सची भागिदारी नोंदविली. वॉर्नरला १०० रन्सवंर मलिंगाने बाद केले. तर क्लार्कला ११७ धावांवर रंगना हेरथने धावबाद केले. यानंतर मलिंगाने हसी बंधूंना थोड्या अंतराने बाद केल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव निर्धारित ५० षटकांत ६ बाद २७१ रन्सवर संपला.
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, March 6, 2012, 17:22


comments powered by Disqus