Last Updated: Saturday, March 10, 2012, 18:37
www.24taas.com, नवी दिल्ली आशिया कपसाठी टीम इंडिया ढाक्याला रवाना झाली आहे. आशिया चषकासाठी भारतासह श्रीलंका, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे.
१३ मार्चला टीम इंडियाची पहिली वन-डे श्रीलंकेबरोबर होणार आहे. ऑस्ट्रेलियातील अपयशानंतर टीम इंडियावर टीकेचा भडीमार होतोय. त्यामुळं आशिया चषकात टीम इंडियापुढे मोठं आव्हान असणार आहे.
आशिया कप संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली (उपकर्णधार), सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, विनयकुमार, रवींद्र जाडेजा, आर.आश्विन, गौतम गंभीर, , प्रविण कुमार, रोहित शर्मा, इरफान पठाण, युसूफ पठाण, राहुल शर्मा, अशोक डिंडा, मनोज तिवारी
First Published: Saturday, March 10, 2012, 18:37