क्रिकेट निवृत्तीचा सचिनकडून इन्कार - Marathi News 24taas.com

क्रिकेट निवृत्तीचा सचिनकडून इन्कार


www.24taas.com, नवी दिल्ली

 
'द वॉल' राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केल्यानंतर, आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत होती. मात्र, सचिनने क्रिकेट निवृत्तीचा  इन्कार केला आहे.
 
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) सूत्रांनी याबाबत माहिती दिली होती. सचिन तेंडुलकर लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती  घेईल, असे म्हटले होते. सचिन तेंडुलकरने  'झी न्यूज' या वृत्तवाहिनीला एसएमएस करून आपण निवृत्त होणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
 
 
सचिन आपले शतकांचे शतक पूर्ण झाल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकण्याच्या विचारात आहे. मात्र, अद्याप सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती.
 
व्हिडिओ पाहा...

First Published: Saturday, March 10, 2012, 21:24


comments powered by Disqus