Last Updated: Sunday, March 11, 2012, 23:15
www.24taas.com, मुंबई 
ऑस्ट्रेलियात सीबी सीरिजमध्ये झालेल्या निराशाजनक कामगिरीचा सचिन तेंडुलकरला मोठा फटका बसला आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये सचिनची मोठी घसरण झाली आहे.
सचिन २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. गेल्या २१ वर्षांमधील सचिनचं हे सर्वात खराब रँकिंग आहे. २१ वर्षांपूर्वी १९९१ मध्ये सचिन ३१ व्या स्थानावर होता. त्यानंतर पहिल्यांदाच सचिन रँकिंगमध्ये इतका मागे पडला आहे. १९९६ला आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच सचिन नंबर वन झाला होता.
बांग्लादेशात सुरु झालेल्या एशिया कपमध्ये सचिनला आपलं रँकिंग सुधारण्यासाठी आणि आपली महासेंच्युरी पूर्ण करण्याची नामी संधी आहे. सचिनचे चाहते गेल्या एक वर्षापासून त्याच्या महासेंच्युरीची वाट पाहत आहेत. आणि एशिया कपमध्ये ती पूर्ण होईल अशीच सर्वांची अपेक्षा असणार आहे.
First Published: Sunday, March 11, 2012, 23:15