श्रीलंकेचा १८८ रन्समध्ये खुर्दा - Marathi News 24taas.com

श्रीलंकेचा १८८ रन्समध्ये खुर्दा

www.24taas.com, मीरपूर
 
 
आशिया करंडक स्पर्धेत श्रीलंकेचा १८८ रन्समध्ये खुर्दा झाला. पाकिस्तानला विजयासाठी केवळ १८९ रन्सचे टार्गेट आहे.
 
 
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेची दाणादाण उडाली.   श्रीलंकेचे सर्व गडी ४५. ४ चेंडूत केवळ १८८ रन्सवर बाद झालेत. कुमार संघकारा आणि तरंगा या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मात्र अन्य खेळाडू अपयशी ठरलेत. पाकच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे कमी रन्सवर श्रीलंकेला आवरता आले.
 
 
कुमार संघकाराने (७१) तरंगाच्या मदतीने श्रीलंकेची बाजू सावरायचा प्रयत्न केला खरा, पण इतर फलंदाज पटापट तंबूत परतल्यामुळे श्रीलंकेची अवस्था बिकट झाली. जयवर्धने (१२), दिलशान (२०), चंडीमल (०) , तिरीमने (७), तरंगा (५७) महारूफ (२), कुलशेखरा (४) , मलिगा (१) आणि लकमाल (०) रन्संवर बाद झाले. पाकिस्तानतर्फे चिमाने ४, आजमलने ३, उमर गुलने २ आणि अझामने १ बळी टिपला.

First Published: Thursday, March 15, 2012, 17:54


comments powered by Disqus