Last Updated: Friday, March 16, 2012, 00:01
www.24taas.com, मीरपूरकर्णधार मिस्बाह उल हक आणि उमर अकमल यांच्या तडफदार फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने आशिया चषकातील अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे.
पाकिस्तानने श्रीलंकेने दिलेले १८९ धावांचे तोकडे आव्हान ३९.५ षटकात पूर्णकरत लंकेला पराभवाची चव चाखायला लावली. पाकचा आशिया चषकातील हा दुसरा विजय आहे. आज झालेल्या पराभावामुळे श्रीलंकेचा संघ अंतिम सामन्याच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कर्णधार मिस्बाहची (७२) शानदार खेळी आणि त्याला दूस-या बाजूने उमर अकमलने दिलेली (७७) तेवढीच महत्त्वापूर्ण साथ. यामुळे पाकिस्तानला विजय मिळविता आला.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेची दाणादाण उडाली. श्रीलंकेचे सर्व गडी ४५. ४ चेंडूत केवळ १८८ रन्सवर बाद झालेत. कुमार संघकारा आणि तरंगा या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मात्र अन्य खेळाडू अपयशी ठरलेत. पाकच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे कमी रन्सवर श्रीलंकेला आवरता आले.
कुमार संघकाराने (७१) तरंगाच्या मदतीने श्रीलंकेची बाजू सावरायचा प्रयत्न केला खरा, पण इतर फलंदाज पटापट तंबूत परतल्यामुळे श्रीलंकेची अवस्था बिकट झाली. जयवर्धने (१२), दिलशान (२०), चंडीमल (०) , तिरीमने (७), तरंगा (५७) महारूफ (२), कुलशेखरा (४) , मलिगा (१) आणि लकमाल (०) रन्संवर बाद झाले. पाकिस्तानतर्फे चिमाने ४, आजमलने ३, उमर गुलने २ आणि अझामने १ बळी टिपला.
First Published: Friday, March 16, 2012, 00:01