Last Updated: Friday, March 16, 2012, 08:18
www.24taas.com, मीरपूर राहुल द्रविडने निवृत्ती स्वीकारल्यावर सचिन तेंडुलकरनेही निवृत्त व्हावं का यावर क्रिकेट जगतात कितीही चर्चा रंगल्या तरी सचिन तेंडुलकर या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या सरावाकडे पूर्ण लक्ष देत आहे. संघातील इतर खेळाडू जेव्हा प्रॅक्टिस चुकवून आराम करत होते, त्यावेळी सचिन मैदानावर बॉलिंगचा सराव करत होता.
आज भारत विरुद्ध बांग्लादेश सामना रंगणार आहे. या सामन्यापूरवी झालेल्या सरावात सचिन तेंडुलकरने राहुल शर्मा आणि युसुफ पठाण यांच्या बॉलिंगवर आपल्या बॅटिंगची प्रॅक्टिस केली. याशिवाय नवे बॉलिंग प्रशि७क जो डॉव्हेस यांच्या बॉलिंगवरही बॅटिंग केली.
फिल्डिंग कोच ट्रॅव्हर पेनी यांच्याबरोबरही सचिनने अभ्यास केला. कोच डंकन फ्लेचर यांचं संपूर्ण वेळ तेंडुलकरवर लक्ष होतं. नेट प्रॅक्टिसनंतर डंकन फ्लेचर तेंडुलकरशी बराच वेळ चर्चा केली. सचिनने फक्त बॅटिंग प्रॅक्टिसबरोबरच बॉलिंगचीही खूप प्रॅक्टिस केली. राहुल शर्माला बॉलिंग टाकत सचिनने बॉलिंगचा सराव केला.
सचिन जितक्या वेळ मैदानावर प्रॅक्टिस करत होता, त्या वेळेत इतर भारतीय खेळाडूंनी आपापल्या खोल्यांमध्ये आराम करण्यालाच पसंती दिली.
First Published: Friday, March 16, 2012, 08:18