सचिनचं विश्वविक्रमी द्विशतक 'टाइम्स'मध्ये - Marathi News 24taas.com

सचिनचं विश्वविक्रमी द्विशतक 'टाइम्स'मध्ये

www.24taas.com, मुंबई
 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन-डे सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध झळकावलेल्या द्विशतकी कामगिरीचीची नोंद टाइम्स मॅगझिनच्या ‘ टॉप टेन स्पोर्टस् मुमेन्ट्स ’ मध्ये घेण्यात आली आहे.
‘स्पोर्ट्समधले काही विक्रम हे अप्राप्य असतात. तिथपर्यंत कोणीही कधीच पोहोचू शकणार नाही असं वाटतं. वन-डे क्रिकेट सामन्यात  एका खेळाडूने २०० धावा करणं, ते ही नाबाद २००... हा एक विक्रमच. सचिन तेंडुलकरचा हा विश्वविक्रम म्हणजे मैलाचा दगड आहे...’ असं ‘ टाइम्स’मध्ये सचिनबद्दल लिहीण्यात आलं होतं. वर्षभरातील निरनिराळ्या खेळांमधील दहा अविस्मरणीय क्षण विचारात घेतले असता त्यात सचिनच्या डबल सेन्चुरीचं स्थान हे वरचं आहे.
फेब्रुवारी महिन्यात ग्वाल्हेर वनडेत सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०० धावांचा विक्रमी डोंगर उभारला होता. सचिनचा हा झंझावात पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली होती. सचिनने १९९ धावा केल्यावर तर प्रत्येक क्रिकेटप्रेमीचा श्वास रोखला गेला होता. त्यानंतर, एक धाव घेऊन सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं द्विशतक पूर्ण केलं. असा जादुई क्षण क्रिकेट रसिक कधीच विसरू शकणार नाहीत असं‘ टाइम्स ’ मध्ये लिहीण्यात आलं आहे..

First Published: Friday, March 16, 2012, 17:49


comments powered by Disqus