विराट कोहलीचा भाव वधारला - Marathi News 24taas.com

विराट कोहलीचा भाव वधारला

www.24taas.com नवी दिल्ली 
 
 
एका जाहिरातीसाठी एक कोटी घेणाऱ्या धडाकेबाज बॅटमन्स विराट कोहलीचा आता भाव एकदम वधारला आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूध्द दीड शतकी केल्यानंतर त्याच्या जाहीरात मानधनात वाढ झाली आहे. त्याने तीन कोटी रूपये घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
ढाक्यातील मिरपूरमधील शतकाने विराटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो अनेकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. त्याची लोकप्रियता कॅच करण्यासाठी जाहिरात करणाऱ्या कंपन्यांमध्ये त्याला खरेदी करण्याठी स्पर्धा लागली आहे. त्यामुळे विराटचा भाव वाढला आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू त्याच्या फलंदाजीसारखेच विक्रम करीत आहे. त्याच्या  आशिया चषकातील शानदार खेळीने सर्वांचेच मन जिंकले.  यामुळे जाहिरातीतही त्याची मागणी वाढली आहे.
 
 
कोहली आता एका जाहिरातीसाठी तीन कोटी रुपये घेत आहे. एक वृत्तपत्रानुसार आगामी काळात कोहली नव्या रेट प्रमाणे दोन-तीन ब्रँडसाठी जाहिराती करणार आहे. एक वर्षापूर्वी कोहली एका जाहिरातीसाठी एक कोटी रुपये घेत असे, आता तो तीन कोटी रुपये घेणार आहे. विराटला प्रॉक्टर अँड गँबलच्या विक्स या ब्रँडसाठी साईन करण्यात आले आहे. बांगलादेशमधून परतल्यानंतर तो एक मोबाईल फोन कंपनी आणि मोबाईल हँडसेटच्या जाहिरातीचा करार करणार आहे.

First Published: Wednesday, March 21, 2012, 17:22


comments powered by Disqus