"राष्ट्रीय टी-२० IPL इतक्याच महत्त्वाच्या"- हरभजन - Marathi News 24taas.com

"राष्ट्रीय टी-२० IPL इतक्याच महत्त्वाच्या"- हरभजन

www.24taas.com, मुंबई
 
टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग याच्या मते राष्ट्रीय ट्वेंटी-२० चँपियनशिप ही देखील आयपीएलइतकीच महत्त्वाची आहे. कारण या मॅचेसमधून खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरील सिलेक्टर्सना प्रभावित करता येऊ शकतं. आणि आयपीएलमध्ये सामील होण्याची संधी मिळू शकते.
 
हरभजन सिंगने टी-२० टुर्नामेंटमध्ये पंजाबच्या टीमला विजय मिळवून दिल्यावर म्हटले, “या टुर्नामेंट्स आयपीएलइतक्याच महत्त्वाच्या आहेत. असा सामन्यांमधून जे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाहीत, त्यांना संधी मिळू शकते. ते आपली क्षमता सिद्ध करू शकतात.”
 
हरभजन सिंगने आत्तापर्यंत देशासाठी ९८ कसोटी सामने खेळले आहेत. याबद्दल बोलताना हरभजन म्हणाला, “माझ्यासारख्या खेळाडूंसाठी अशा टुर्नामेंट्स खूप उपयोगी आहेत. कारण, अशा टुर्नामेंट्समधून आयपीएलची तयारी करता येते. अशा स्पर्धा केवळ अभ्यासापुरत्या मर्यादित नसून अत्यंत गांभिर्याने घ्यायच्या स्पर्धा आहेत.”
 

First Published: Saturday, March 24, 2012, 17:39


comments powered by Disqus