Last Updated: Sunday, March 25, 2012, 15:18
www.24taas.com, मुंबई
महाशतकानंतर सचिन प्रथमच मीडिया समोर आला. सचिनने साऱ्या प्रश्नांची अगदी दिलखुलापणे उत्तरं दिली, काय म्हणाला सचिन?? त्याच्या पत्रकार परिषदेतले काही ठळक मुद्दे : मी सध्यातरी निवृत्ती घेणार नाही - सचिन
माझा प्रयत्न असेन की पुढचा वर्ल्डकप मी खेळू स्वप्न पाहा आणि साकारण्यासाठी मेहनत करा मी क्रिकेटचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करीत असतो इंडियन टीमची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे माझ्या चाहत्याने जर वाटतं की, मी खेळावं तर मी प्रयत्न करीन बाकी सगळं देवाच्या हातात आहे २००७ मध्ये मला विचारलं होतं की, २०११ वर्ल्डकप खेळणार का? तेव्हाही मी उत्तर देणं टाळलं होतं २०१५चा वर्ल्डकप खेळीन की नाही माहीत नाही स्वप्नापर्यंत पोहचायचं असेल तर मार्ग नेहमीच खडतर असतो, शॉर्टकट कधीच वापरू नका टीम इंडिया अव्वल स्थानावर लवकरच येईल माझे कोच आचरेकर यांनी मला जास्तीत जास्त मॅच खेळायले दिले त्याचाच फायदा आज मला होतो आहे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौरा अत्यंत खडतर होता चाहत्यांचे आशिर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत मी महाशतक करून घरी आलो तेव्हा मित्रांनी दिलेली पार्टी एक छान सरप्राईज होतं महाशतक झाल्यानंतर कुटुंबियांनी गोव्यात केलं सेलिब्रेशन वर्ल्डकपसाठी मी २२ वर्ष वाट पाहिली यशाचा शिखरावर असताना रिटायरमेंट घेणं हे स्वार्थीपणाचं वाटतं योग्य वेळी मी रिटायरमेट घेईल महासेंच्युरीनंतर तणावमुक्त झाल्यासारखं वाटतं आहे १०० व्या शतकाचा माझ्यावर दबाव नक्कीच होता माझा १०० शतकांचा रेकॉर्ड जर मोडला गेला तर तो एका भारतीय खेळाडूने मोडावा अशी माझी इच्छा असेल ज्यांनी क्रिकेटमध्ये कधी शतकं केलं नाही, ते माझ्या शतकाबद्दल बोलत आहे, पण जर चागंला हेतू असेल तर ठीक आहे माझे हिरो माझे बाबा आहेत.. त्यांच्यापासून मी नेहमीच प्रेरणा घेतो विक्रमासाठी मी कधीच खेळत नाही माझे कुटुंबिय आणि मित्र आम्ही कधीच क्रिकेटवर बोलत नाहीत शतकाचं शतक हे माझं ध्येय नव्हतं, मला फक्त रन करणं गरजेचं वाटतं टीमचा विजय माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचा आहे वर्ल्डकप जिकंण हे माझं स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण केलं मला सध्यातरी कोणालाही काहीही करून दाखवण्याची गरज वाटत नाही टेस्ट क्रिकेटमध्ये नेहमीच जास्तीत जास्त आव्हानाचा सामाना करावा लागतो मी टेस्ट क्रिकेटला नेहमीच प्राधान्य दिलं आहे जेव्हा मला डॉन ब्रॅडमन यांनी त्याच्या जागतिक टीम मध्ये स्थान दिलं होतं तो क्षण खूप महत्त्वाचा होता कोच आणि कुटूंबांचा माझ्या यशात फार मोठा वाटा आहे देशासाठी खेळत राहणं माझं हे माझं स्वप्न आहे क्रिकेट माझं पॅशन आहे. त्यामुळे जेव्हा मला वाटेल की मी कुठे कमी पडतो आहे तेव्हा मी खेळ सोडेल जे मला रिटायर होण्याचा सल्ला देतात ते मला टीममध्ये घेऊन आलेलं नाही रेकॉर्ड आपोआप होत असतात त्याचा फरक मला पडत नाही माझं लक्ष फक्त माझ्या खेळावर असते
First Published: Sunday, March 25, 2012, 15:18