सचिनसाठी अण्णांची बॅटींग - Marathi News 24taas.com

सचिनसाठी अण्णांची बॅटींग

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्ध
 
सचिनला भारतरत्न मिळावं ही मागणी गेली अनेक दिवस जोर धरून आहे. प्रत्येक क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींनी सचिनला भारतरत्न मिळावं अशी मागणी करत असतानाच आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा सचिनला भारतरत्न मिळावं अशी मागणी केली आहे. टीम अण्णांचे सदस्य सुरेश पठारे यांनी ट्विटर वर ट्विट केले आहे.
 
अण्णा यांनी केलेल्या वक्तव्याने क्रीडारसिकांचे लक्ष पुन्हा एकदा सचिनला भारतरत्न मिळणार की नाही याकडे जाणार आहे. सचिनला भारतरत्न मिळावं अशी मागणी अण्णांनी केल्याचे सुरेश पठारे यांनी टि्वटर म्हटंले आहे. गेली अनेक दिवस सर्वच  थरातून ही मागणी केली जात आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांनी सुद्धा नुकताच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सचिनला भारतरत्न मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती. परंतु भारतरत्न हे खेळामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या दिले जात नाही. त्यामुळे भारतरत्न मिळावं यासाठी त्या कायद्यामध्ये विशेष तरतूद करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारला कायद्यात बदल घडवणं गरजेच आहे. यामुळे सचिनला भारतरत्न मिळण्यासाठी काही काळ नक्कीच थांबावं लागणार आहे.

First Published: Wednesday, November 16, 2011, 09:37


comments powered by Disqus