Last Updated: Wednesday, March 28, 2012, 09:22
www.24taas.com, नवी दिल्ली भारतीय फास्ट बॉलर ईशांत शर्मा घोट्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या घोट्याच्या दुखातीवर या महिन्याच्या अखेरीस शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शस्त्रक्रियेनंतर ईशांतला तब्बल ६ महिने क्रिकेट ग्राऊंडपासून लांब राहावं लागणार आहे. ईशांत आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सचं प्रतिनिधीत्व करतो. याआधी ऑस्ट्रेलिया दौ-यात खेळलेल्या ईशांतला केवळ पाच विकेट्सच घेता आल्या होत्या.
दिल्ली डेयरडेव्हिल्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग चार एप्रिलपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)साठी पूर्ण तंदुरुस्त झाला असून, त्याने संघाबरोबर सराव केल्यानंतर एकट्याने फलंदाजीवरही मेहनत घेतली. प्रशिक्षकांनी सेहवाग आपल्या पुनरागमनाबद्दल खूष असल्याचे सांगितले. दरम्यान, भारताचा जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा घोट्याच्या शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे ईशांतचा फटका संघाला बसण्याची शक्यता आहे.
First Published: Wednesday, March 28, 2012, 09:22