Last Updated: Wednesday, March 28, 2012, 17:27
www.24taas.com 
टीम इंडियाच्या सिनियर्समध्ये यंग दिसण्याची रेस लागली आहे. क्रिकेटच्या मैदानावर तर त्यांची नजर आहेच शिवाय आपल्या लुक्सवरही ते खास लक्ष देत आहेत. आपल्या नव्या हेअरस्टाईलमध्ये सचिननं महासेंच्युरी तर ठोकलीच आहे. आणि २०१५ चा वर्ल्ड कप खेळण्याचे संकेतही दिले. तर कधी आपल्या बॅटिंगमुळे तर कधी आपल्या हेअरस्टाईलमुळे कायम चर्चेत असलेला धोनीही आपल्या जुन्या हेअरस्टाईलमध्ये लवकरच परतणार आहे.
मास्टर-ब्लास्टर आणि धोनीमध्ये लुक चेंज करण्याची रेस लागली आहे. स्वत:ला यंग सिद्ध करण्यासाठीची ही रेस आहे. जवळपास एक महिन्यानंतर सचिन तेंडुलकर ३९ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. तर महेंद्रसिंग धोनी आपला ३२ वा वाढदिवस जुलैमध्ये सेलिब्रेट करणार आहे. बांग्लादेशमधील एशिया कपमध्ये सचिन नव्या हेअरस्टाईलमध्ये आपल्या चाहत्यांना दिसला.
लुक बदलल्यानंतर लगेचच वर्षभरापासून वाट पाहावी लागणारी महासेंच्युरी त्यानं पूर्ण केली. आणि नव्या लुकमध्ये सचिनचा बदललेला अंदाजही क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. एशिया कपच्या पराभवानंतर धोनीही वेगळ्या रंगात दिसला. सहाव्यांदा एशिया कप त्याला भारताला जिंकून देता तर आला नाहीच शिवाय वर्ल्ड चॅम्पियन हे बिरुदही फार काळ कायम राखता आलं नाही. मैदानावर तो हिट ठरला नाही मात्र मैदानाबाहेर त्यानं आपल्या गाण्याचं टॅलेंट साऱ्यांनाचं दाखवलं.
क्रिकेटच्या मैदानावर सतत अपयश येत असल्यामुळे धोनीला आता आपल्या लांब केसांची आठवण झाली आहे. सचिननं २०१५ वर्ल्ड कप खेळण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे धोनीनं २०१३ मध्ये २०१५ च्या वर्ल्ड कप खेळण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये अनोखी रेस सुरु झाली आहे असंच म्हणाव लागणार आहे.
First Published: Wednesday, March 28, 2012, 17:27