सचिन तेंडुलकर युवराजच्या भेटीला - Marathi News 24taas.com

सचिन तेंडुलकर युवराजच्या भेटीला

www.24taas.com, लंडन
 
सचिन तेंडुलकरने अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये कँसरवर उपचार घेत असणाऱ्या युवराज सिंगची भेट घेतली आणि त्याची विचारपूस केली. बुधवारी दोघांनी युवराजच्या एका मित्राच्या घरी एकमेकांची भेट घेतली आणि सुमारे तासभर गप्पा मारल्या. एकमेकांना भेटताच सचिनने युवराजला कडकडून मिठी मारली. दोघांनी एकत्र फोटो काढले. युवराज सिंग सचिनला नेहमीच आपला आदर्श मानत असल्यामुळे युवराजला सचिनच्या भेटीने खूप आनंद झाला.
 
युवराजला यापूर्वी माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन अनिल कुंबळेनेही भेट देऊन त्याची विचारपूस केली होती. गेल्या महिन्यापासून बोस्टनमध्ये उपचार घेत असलेला युवराज मे महिन्यात पुन्हा खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो. उपचारांदरम्यान युवराजचे केसही गेले होते. युवराजवरील केमोथेरपीचे उपचार १८ मार्च रोजी पूर्ण झाले. यानंतर एप्रिलमध्ये रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं.
 
वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भुमिका बजावणारा युवराज गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत एकही टूर्नामेंट खेळू शकलेला नाही. युवराज पुन्हा मैदानावर खेळण्यासाठी केव्हा येईल यांचीच त्याचे चाहते वाट पाहत आहेत. युवराजने ३७ टेस्टमध्ये ३४.८० च्या स्ट्राईक रेटने १७७५ रन काढले आहेत. तर २७४ वनडे मध्ये ३७.६२ च्या स्ट्राईक रेटने ८०५१ रन काढले आहेत. तर २३ टी-२० मॅचमध्ये त्याच्या नावावर ५६७ रन केले आहेत.

First Published: Thursday, March 29, 2012, 23:09


comments powered by Disqus