भारत-आफ्रिका टी २० आज - Marathi News 24taas.com

भारत-आफ्रिका टी २० आज

www.24taas.com, जोहान्सबर्ग 
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान आज एकमेव टी-20 मॅच खेळली जाणार आहे. जोहान्सबर्ग इथं होणा-या या मॅचमध्ये तरी टीम इंडिया विजयी ट्रॅकवर परतेल का याकडे भारतीय क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागून राहिलय. न्यू वाँडर्स स्टेडियमवर खेळल्या जाणा-या मॅचसाठी टीम इंडियाची युवा ब्रिगेड ग्राऊंडवर उतरणार आहे.
 
 
धोनीच्या कॅप्टन्सीखाली गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा आणि सुरेश रैनावर टीम इंडियाच्या बॅटिंगची भिस्त असेल. तर पठाण बंधू आपला पठाणी हिसका दाखवायला आतूर असतील. बॉलिंगची धूरा प्रवीण कुमार, विनय कुमार, आर. अश्विन आणि राहुल शर्मा सांभाळतील.
 
 
तर भारतीय बॉलर्सना आव्हान देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडे जोहान बोथाच्या कॅप्टन्सीखाली जॅक कॅलिस, ऍल्बी मॉर्केल, कॉलिन इन्ग्रॅमसहित युवा बॅट्समन सज्ज असतील. न्यूझीलंड दौरा आटपून लगेचच दक्षिण आफ्रिका ही मॅच खेळणार आहे. थकलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची ही चांगली संधी टीम इंडियाकडे आहे.
 
 

First Published: Friday, March 30, 2012, 15:33


comments powered by Disqus