धोनी परततोय जुन्या 'हेअरस्टाइल'कडे - Marathi News 24taas.com

धोनी परततोय जुन्या 'हेअरस्टाइल'कडे

www.24taas.com, मुंबई
 
लांब केस ही महेंद्रसिंग धोनीची खऱ्या अर्थानं ओळख होती. लांब केसामुळेच त्यानं साऱ्या क्रिकेटप्रेमींच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. आता पुन्हा एकदा तो आपल्या लांब केसांच्या हेअरस्टाईलमध्ये परतण्याच्या प्रयत्नात आहे.
 
महेंद्रसिंग धोनीनं आपल्या स्फोटक बॅटिंग आणि हेलिकॉप्टर शॉटनं क्रिकेटमध्ये थोड्याच कालावधीत आपल्याभोवती एक वेगळ वलय निर्माण केलं. मात्र, त्याच्या बॅटिंगआधी त्याच्या केसावरच चाहत्यांची नजर आधी गेली. आपल्या लांब केसांमुळेच तो यंगिस्तानचा स्टाईल आयकॉन बनला. इतकचं नाही तर परवेझ मुशर्फनीही त्याच्या लांब केसाचं कौतुक केलं होतं.
 
काळ बदलला तसा धोनीच्या केसांचा रंगही बदलला. आणि त्याचा अंदाजही बदलला. त्यानंतर भारताचा कॅप्टन कूल एका नव्या अवतारात चाहत्यांना पाहायला मिळाला. त्यानंतर २०११ च्या वर्ल्ड कप विजेतपदाच्या दुसऱ्याच दिवशी धोनी संपूर्ण टक्कल करून क्रिकेटप्रेमींसमोर आला. मात्र, आता त्यानं आपल्या जुन्या हेअरस्टाईलमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लहानपणापासून ते आजपर्यंत धोनीचा ववेगवेगळा अंदाज चाहत्यांनी पाहिला आहे.  छोट्या शहरातील एका सामन्य घरातला मुलगा आज आपल्या कामगिरी आणि स्टाईलमुळे युथ आयकॉन बनलाय.

First Published: Friday, March 30, 2012, 17:55


comments powered by Disqus