कठीण प्रसंगात सचिनशीच बोलायचो- युवी - Marathi News 24taas.com

कठीण प्रसंगात सचिनशीच बोलायचो- युवी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपद मिळवण्यात सर्वात मोलाचं योगदानं होतं ते युवाराजचं. युवराजची जबरदस्त आणि ऑलराऊंड परफॉमन्समळे टीम इंडिया अशक्यप्राय विजय मिळवता आले आहेत. त्याच्या कॅन्सरमुळे युवराज गेल्या काही महिन्यांपासून  मैदानाबाहेर आहे.
 
मात्र वर्ल्ड कपमधील त्याचा परफॉमन्स आजही त्याला सुखकारक असाच आहे. वर्ल्डकप दरम्यान युवीचा फॉर्म सुप्रिम होता. आणि त्याच्या याच गोष्टींना युवीने आज उजाळा दिला. त्याच्या ऑलराऊंडर पर्फॉमन्सनं वर्ल्डकपमध्ये भारताला अनेक अशक्यप्राय विजय मिळवता आले.
 
युवराजने विश्वचषकात त्याने केलेल्या कामगिरीबद्दल देवाचे आभार मानले. वर्ल्डकपच्या आधी ज्यावेळेस माझ्या करिअरमध्ये गोष्टी नीट होत नव्हत्या, त्यावेळेस सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांनी मला खूप मदत केली, हे युवराजने आवर्जून नमूद केलं आहे.
 
माझ्या कठीण प्रसंगात मी सचिनशी बोलायचो. माझ्या फॉर्मबद्दल, माझ्या फिटनेसबद्दल मी सचिनशी बोलायचो, तेव्हा त्याने मला केलेले मार्गदर्शन हे माझ्यासाठी खूप मोलाचं होतं. भारताने तब्बल २८ वर्षानंतर वर्ल्डकप जिंकल्याला उद्या १ वर्ष पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळेच युवीने आपल्या फॅन्सशी संवाद साधला आहे.
 
 
 
 
 

First Published: Sunday, April 1, 2012, 23:07


comments powered by Disqus