Last Updated: Tuesday, April 3, 2012, 19:08
www.24taas.com, बंगळूरू भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहली याला ' द वॉल' राहुल द्रविड आणि माजी फिरकी खेळाडू अनिल कुंबळे यांच्याकडून मार्गदर्शन हवे आहे. तसे त्यांने बोलून दाखविले आहे. या दोघांनी आपल्याला मार्गदर्शन केले तर आपल्यात सुधारणा होईल.
विराट कोहलीने गेल्या काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. द्रविड आणि कुंबळे यांच्यातील अनेक गुण मी माझ्यामध्ये घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मला मिळायला हवे आहे. राहुल द्रविडचे धैर्य वाखाणण्याजोगे आहे. तर कुंबळेमध्ये लढण्याची जबरदस्त क्षमता असून, तो शेवटपर्यंत पराभव स्वीकारत नाही, हेच गुण माझ्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे मला चांगल्या प्रकारे खेळता येईल आणि यापेक्षा चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा भारताचा धडाकेबाज खेळाडू विराटने बोलून दाखविले आहे.
First Published: Tuesday, April 3, 2012, 19:08